adhaar card google
देश

तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे आधार कार्ड आहे ?

हे कार्ड प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे असून यात व्यक्तीची ओळख संख्येवरून होते.

नमिता धुरी

मुंबई : आधार कार्ड हे काही महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डशिवाय कोणतेही खासगी आणि सरकारी काम होणे कठीण असते. बँकांमध्ये केवायसी अद्ययावत करण्यापासून ते मोबाईलचे सिम कार्ड बनवण्यापर्यंत सगळीकडे त्याचा उपयोग होतो.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणातर्फे (UIDAI) आधार कार्ड दिले जाते. हे कार्ड प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे असून यात व्यक्तीची ओळख संख्येवरून होते. या आधार कार्डचे विविध प्रकार असतात ही गोष्ट अनेकांना माहीत नसते. हे प्रकार कोणते ते जाणून घेऊया....

आधार लेटर : UIDAIतर्फे आधार कार्ड दिले जाते. त्यावर क्यू आर कोड आणि कार्ड तयार केलेल्या दिवसाची तारीख लिहिलेली असते. नवीन नोंदणी किंवा बायोमेट्रीक अपडेट केल्यावर हे कार्ड नागरिकांना सर्वसाधारण टपाल व्यवस्थेद्वारे घरी पाठवले जाते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आधार कार्ड हरवल्यास UIDAIच्या संकेतस्थळावरून त्याची पुनर्छपाई करता येते. असे कार्ड स्पीड पोस्टद्वारे पाठवले जाते.

एम आधार : UIDAIने एक मोबाईल अॅप विकसित केले आहे. हे अॅफ smartphoneमध्ये इन्स्टॉल करता येते. हे अॅप google store किंवा IOS मधून इन्स्टॉल करता येते. याद्वारे कार्डधारकांना नोंदणीकृत आधार तपशीलासाठी इंटरफेस मिळतो. यात डेमोग्राफीक माहितीसह, छायाचित्र आणि आधार क्रमांक असतो. यात ऑफलाइन व्हेरीफिकेशनसाठी सुरक्षित कोडही असतो. एम आधार मोफत डाऊनलोड करता येते.

ई - आधार : ही आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आहे. ही आवृत्ती UIDAIद्वारे डिजिटली साक्षांकित केली जाते. यात कार्ड तयार करण्यात आल्याची तारीख, ऑफलाइन व्हेरिफिकेशनसाठी सुरक्षित कोड असतो. यासाठी सांकेतांकाची गरज असते. UIDAIच्या संकेतस्थळावरून ई-आधार आणि मास्क्ड ई-आधार डाऊनलोड करता येते. मास्क्ड ई-आधारमध्ये केवळ शेवटचे चार अंकच दिसतात.

आधार पीव्हीसी कार्ड : आधार कार्डप्रमाणेच दिसणारे पीव्हीसी कार्ड असते. यात डिजिटली साक्षांकित क्यूआर कोड असतो. यात छायाचित्रासह डेमोग्राफीक माहिती असते. UIDAIच्या संकेतस्थळावरून ५० रुपये भरून हे कार्ड ऑनलाइन ऑर्डर करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

Karad Crime : शेणोलीजवळ सिग्नलवर लाल फडके टाकुन प्रकार सह्याद्री एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; अज्ञात चौघाविरोधात गुन्हा

Latest Marathi News Live Update : पन्हाळा : अल्पवयीन मुलाकडून दुचाकीने धडक दिलेल्या वृद्धाचा मृत्यू, मुलासह वडिलांवर गुन्हा

Motor Vehicle Rule: चालकांना दिलासा! आता अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SRH VS PBKS RESULT: पंजाबचा सर्वात मोठा विजय; हैदराबादला पराभूत करून IPL 2026 Point Table मधील पकड केली मजबूत

SCROLL FOR NEXT