CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Team eSakal
देश

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी १२०० कोटी द्या - उद्धव ठाकरे

सुधीर काकडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्रालयाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली असून,या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्याला नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी १२०० कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने नक्षलवाद आणि माओवादासारख्या देशविरोधी घटकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे धोरण ठरवत असून, यामध्ये राज्यांनाही विचारात घेतले जाणार आहे. त्यासाठी देशातील नक्षल आणि माओवादग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. सुत्रांच्या हवाल्यानुसार या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी १२०० कोटी रुपयांची गरज असून, गृहमंत्रालयाने ही मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ आणि मध्य प्रदेश राज्यांचे मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधींना त्यांच्या राज्यांमधील सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी या बैठकीला आमंत्रीत करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT