Sadhvi Saraswati
Sadhvi Saraswati esakal
देश

गायींच्या रक्षणासाठी घरात तलवारी ठेवा, साध्वींचं वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

साध्वी सरस्वती यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलंय.

साध्वी सरस्वती (Sadhvi Saraswati) यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलंय. सरस्वती यांनी जनतेला गायी (Cow) आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी घरात तलवारी ठेवण्याचं आवाहन केलंय. त्या विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) नेत्या असल्याचं बोललं जातंय. विहिंपनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात साध्वी सरस्वती म्हणाल्या, फोनवर लाखो खर्च करण्याऐवजी लोकांनी गायींच्या सुरक्षेसाठी तलवारी (Sword) आणि शस्त्रे खरेदी केली पाहिजेत.

साध्वी पुढे म्हणाल्या, जर लोक लाखो रुपयांचा मोबाईल खरेदी करू शकत असतील, तर ते आपल्या गायींच्या रक्षणासाठी नक्कीच शस्त्रे खरेदी करू शकतात आणि घरीही ठेवू शकतात. यामुळं लोक त्यांच्या 'दैवी मातेचं' गोहत्येपासून संरक्षण करतील, असं त्यांचं म्हणण आहे.

उडुपी जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना साध्वी यांनी वरील वादग्रस्त विधान केलंय. साध्वी म्हणाल्या, माझा जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या थांबवणं हे माझं परम कर्तव्य आहे. ज्या दिवशी माझा जन्म झाला, तेव्हापासून माझ्याकडं दोन संकल्प होते. एक म्हणजे, भगवान रामाचं (Lord Rama) मंदिर बांधण्याचं आणि दुसरं भारतात गोहत्या बंद करण्याचं, असं त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

MS Dhoni: धोनीचं श्वानप्रेम! फादर्स डे निमित्त लेकीनं शेअर केला तो खास Video; एकदा पाहाच

T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

SCROLL FOR NEXT