देश

मोदींच्या आभाराचे बोर्ड लावा; UGC चे शिक्षणसंस्थांना आदेश

विनायक होगाडे

मुंबई : देशभरात 18 आणि त्यापेक्षा वर्षे वयोगटातील तरुण आणि नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरणा साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्याची विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्था यांच्या कॅम्पसमध्ये बॅनर लावले जावेत, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी दिल्या आहेत.या सूचनांची नीट अंमलबजावणी व्हावी, आणि त्यासाठी जैन यांनी एक परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकात युजीसीने देशातील सर्वच केंद्रीय, राज्यस्तरीय,विद्यापीठे, खाजगी शिक्षण संस्था, स्वायत्त संस्था, महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था आदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र यूजीसीच्या या सूचनांवर राज्यातील विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे, एकीकडे विद्यार्थ्यांना अजूनही मोफत लस मिळत नाही अशा स्थितीमध्ये नुसता आपला प्रचार करणे आणि त्यांचे आभार मानण्यासाठी यूजीसीने आग्रह धरणे हे चुकीचे असल्याचे मत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी कडून व्यक्त करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात 21 जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात 21 जून रोजी देशात तब्बल 69 लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन करत वेल डन इंडिया, असेही म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर यूजीसीने केंद्र सरकारच्या या गतीमान लसीकरण मोहिमेचे आभार मानण्याच्या सूचना विद्यापीठा अनुदान केल्या आहेत.

अशा आहेत सूचना...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करणारे फलक सोशल मीडियावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत,. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मान्यताप्राप्त डिझाईन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध असेल आणि ते सोशल मीडियाला जोडावे. या डिझाईनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून ‘धन्यवाद पीएम मोदी’ असा आशयही लिहिण्यात आला आहे. तो मेसेज या फलकांवर लावण्यात यावा अशा सूचना यूजीसीने दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT