UGC सकाळ डिजिटल टीम
देश

CUET 2022 गुणांवर पदवीला प्रवेश द्या; UGC चं महाविद्यालयांना आवाहन

UGC ने देशातील सर्व खासगी व सरकारी विद्यापीठांना तसं पत्र पाठवलं आहे.

सुधीर काकडे

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विविध खाजगी आणि सरकारी विद्यापीठांना पत्र लिहून 2022-2023 या शैक्षणिक वर्षातील पदवीचे प्रवेश सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्टचे गुणांवरून द्यावेत अशा सुचना दिल्या आहेत. सर्व विद्यापीठांना लिहिलेल्या पत्रात, UGC ने अनेक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी आगामी काळातील शैक्षणिक वर्षासाठी CUET प्रक्रियेचा अवलंब करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु, संचालक आणि प्राचार्यांना या सुचना देण्यात आल्या असून, त्यांना प्रवेशाची पद्धत निवडण्यास सांगितलं आहे. प्रवेशासाठी एकतर बारावीच्या गुणांचा किंवा प्रवेश परीक्षा घेण्याचा पर्याय शैक्षणिक संस्थासमोर ठेवला आहे. विविध प्रवेश परीक्षांमध्ये येणारे अडथळे आणि वेगवेगळ्या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना करावा लागणारा संघर्ष याबद्ददल चिंता दर्शवत व्यक्त करत, आयोगाने शैक्षणिक संस्थांना प्रवेशासाठी CUET 2022 चे गुण विचारात घेण्याचे आवाहन केले आहे.

वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा या वेगवेगळ्या तारखांना होतात, काही वेळा त्या सोबतच येतात, काही वेळा विद्यार्थी वेगवेगळ्या दोन परीक्षांमध्ये पात्र होतात. तसंच वेगवेगळ्या बोर्डातून आलेल्या विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी युजीसीने हा पुढाकार घेतला असून, त्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच! सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं; काय म्हणाले CJI सूर्यकांत?

High Court: भारत धर्मनिरपेक्ष! दिया मिर्झाचा डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा शेअर करा; हायकोर्टानं भाजपला फटकारलं

Pune Bangalore Highway Traffic : राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाक्यावर चक्का जाम, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिका बंद होणार? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार, देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT