admissions  sakal
देश

विद्यार्थ्यांची डिजिलॉकरमधील डॉक्युमेंट वैध, शैक्षणिक संस्थांनी स्वीकारावीत - UGC

कोरोना काळात विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या.

सुधीर काकडे

डिजीलॉकर (DigiLocker) या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या पदव्या, गुणपत्रिका यांसारखी शैक्षणिक कागदपत्रं वैध दस्तऐवज म्हणून गृहीत धरली जावेत, अशा सुचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) उच्च शैक्षणिक संस्थांना केली आहे. नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी (NAD) हे डिजिटल स्वरूपातील शैक्षणिक दस्तऐवजांचं ऑनलाइन भांडार आहे. शिक्षण मंत्रालयाने NAD ला कायस्वरुपीची तरतुद म्हणून लागू करण्यासाठी सांगितल्यानंतर या सुचना दिल्या असल्याचं आयोगाने सांगितलं आहे.

नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी (NAD) हे शैक्षणिक कागदपत्रांचं ऑनलाइन स्टोअरहाऊस आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ महाविद्यालय आणि बोर्डाकडून थेट डिजिटल स्वरूपात मुळ दस्तऐवज/प्रमाणपत्रं कोणत्याही वेळी, कुठेही मिळवता येतात. शिक्षण मंत्रालयाने (MoE) DigilLocker च्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शुल्क न आकारता दस्तऐवज मिळवण्यासाठी कायमसाठीची तरतुद करण्यासाठीच्या सुचना UGC ला दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आपली कागदपत्र मिळवण्यासाठी फार कष्ट घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

NAD कार्यक्रमाच्या मर्यादा वाढवण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना डिजीलॉकर खात्यामधून प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये उपलब्ध असलेली पदवी, मार्कशीट आणि इतर कागदपत्रं वैध कागदपत्रं म्हणून स्वीकारण्याची विनंती केली असल्याचं UGC ने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT