देश

Ujjwala Yojana Failure: उज्वलाने पुन्हा पेटवली चूल; गॅसचे भाव परवडेना; सवलतही बंद!

सकाळ डिजिटल टीम

Ujjwala Yojana Failure: दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच जंगलतोड आणि चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत घरोघरी सिलिंडरचे वितरण केले होते. मात्र, एकीकडे गॅसचे भाव गगनाला भिडले असताना दुसरीकडे सवलतही बंद झाल्याने उज्ज्वला योजनेचे लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत आहेत.

देशातील गरीब कुटुंबांतील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत गरीब महिलांना १०० रुपयांत गॅसची जोडणी मिळणार आहे. सध्या पनवेलमध्ये या योजनेचे २ हजार १५५ ग्राहक आहेत. काही वर्षे या योजनेतून अगदी माफक दरात गॅस सिलिंडर मिळाला.

त्यामुळे चुलीमधून निघणाऱ्या धुरापासून महिलांची सुटका झाली होती, पण आता गॅसचे दर तब्बल हजाराच्या घरात गेले असल्याने योजनेतील लाभार्थ्यांना त्याची झळ बसू लागली आहे. पनवेलच्या ग्रामीण भागांतील आदिवासी, मजूर तसेच शेतकऱ्यांना दिवसभर रोजंदारी करून घरातील आर्थिक घडी बसवणे जिकीरीचे झाले आहे, तर घरगुती गॅसचे भाव वाढल्याने ग्रामीण भागांत पुन्हा चुलींसाठी सरपण गोळा करण्याची महिलांची धावपळ सुरू झाली आहे.

योजनेच्या अपयशाची कारणे

धुरामुळे फुप्फुसाचे आजार होतात, डोळ्यांना त्रास होतो, तसेच जंगलतोडही होते. त्यामुळे घराघरांत गॅस पोहोचला पाहिजे, या हेतूने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाली होती. मात्र, आता महागाईमुळे अनेक घरांमध्ये गॅसचे रिकामे सिलिंडर भरण्याचीही अडचण होत आहे.

गेल्या सात वर्षांत ४१० रुपयांवरून घरगुती गॅसचा दर १,०६० रुपयांवर पोचला आहे. त्यात ग्रामीण भागात तर घरपोच करण्यासाठी १,०८० रुपये लागत आहेत. त्यात आता अनुदान मिळत नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.

हागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. सरकारने गॅसचे दर ९०० च्या पुढे नेऊन ठेवले आहेत. मोलमजुरी करून पोट भरायची भ्रांत असताना एवढे पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न सतावत आहे.

- पद्मा शिंगवा, गाढेश्वर, गृहिणी

स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असून यामुळे आमचे बजेट कोलमडत आहे. गोरगरीब आणि अत्यल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत जोडणी मोफत मिळाली; परंतु सबसिडी बंद झाल्याने सिलिंडर परवडत नाही.

- शारदा खैर, खैरवाडी, गृहिणी

आधार कार्ड व रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन त्यावेळी शेगडी आणि गॅस दिला गेला. दोन हजार रुपये मोजावे लागले. आता दर महिन्याला सिलिंडरचे भाव वाढताहेत. आता डोंगरात, रानावनात जाऊन सरपण गोळा करावे लागते.

- जागृती कातकरी, आंबे शिवनसई, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT