said ali shah geelani 
देश

‘गिलानींबद्दल अनधिकृत माहिती प्रसिद्ध करू नये’

पीटीआय

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेते सईद अली गिलानी यांच्या प्रकृतीविषयी व त्यांच्यासंबंधी अन्य कोणत्याही गोष्टींची अनधिकृत माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन गिलानी यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सईद अली गिलानी यांचे राजकीय प्रतिनिधी अब्दुल्ला गिलानी यांच्याकडून गिलानी यांच्याबाबत अधिकृत तपशील मिळाल्याशिवाय कोणतेही वृत्त प्रसिद्ध करू नये, असे निवेदन त्यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिले असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली. गिलानी यांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गिलानी यांची प्रकृती खालावत असून आम्ही गेल्या काही महिन्यांपासून आम्ही शारीरिक व मानसिक ताणाखाली आहोत.

त्याचबरोबर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरून जी उलट-सुलट चर्चा सुरू आहे, त्यामुळे आमच्या खासगी व सार्वजनिक आयुष्‍याचे नुकसान होत आहे. त्यामुळे यापुढे गिलानींच्या प्रकृती किंवा राजकारणाशी संबंधित त्यांची  कोणत्याही माहिती त्यांच्या प्रतिनिधीच्या दुजोऱ्याशिवाय प्रसिद्ध करू नये, अशी विनंती गिलानी यांचे पुत्र डॉ. नईम गिलानी, डॉ. नसीम गिलानी आणि जावई झहरूर उल हक गिलानी यांनी केली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

SCROLL FOR NEXT