Gujarat Bridge Collapse Esakal
देश

Gujarat Bridge Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश

गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात निर्माणाधीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ओव्हरब्रिजचा मोठा भाग खाली कोसळला. ओव्हर ब्रिजचे पाच गडर्स एकाच वेळी खाली कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये काम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची आहे. यासंबधीचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

पालनपूरमध्ये आरटीओ सर्कलच्या जवळ पुलाचे काम सुरू असताना ही घटना घडली आहे. रिक्षाचालक जीव वाचवण्यासाठी धावत असताना अचानक पुलाचा स्लॅब कोसळल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते आहे.

पूल कोसळल्याचा मोठा आवाज आला त्यानंतर आजूबाजूचे लोक घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. यासंबधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PoK Election Violence : पीओके विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार; गोळीबाराचा थरारक व्हिडिओसमोर, ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Water Supply : पुणेकरांसाठी मोठा दिलासा! धरणांमध्ये ९१.४७ टक्के पाणीसाठा; खडकवासला पूर्ण भरले

Latest Live Updates Marathi : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरली; अनेक जण जखमी

Radhanagari Dam Water Discharge : राधानगरी धरण 90 टक्के भरले; चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले, 14 धरणांत किती आहे पाणीसाठा?

Bribe Case: अवैध वाळू वाहतूक प्रकरणी आधी ट्रॅक्टर जप्त केला, नंतर कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; वनपाल, वनरक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT