देश

मी गांधीविरोधकच! फाशी दिली तरी कालीचरण वक्तव्यांवर ठाम; VIDEO जाहीर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबरच्या दरम्यान वेद निकेतन धाममध्ये आयोजित करण्यात आलेल्या धर्म संसदेमध्ये मुस्लिमांमविरोधात द्वेषपूर्ण आणि चिथावणीखोर अशी वक्तव्ये करण्याचं प्रकरण सध्या देशात चांगलंच गाजतंय. राष्ट्रपिता महात्मा गांधींवर (Mahatma Gandhi) वादग्रस्त विधान करणारे कथित संत कालीचरण महाराजाने आता एक व्हिडीओ जाहिर करत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं विधान केलंय. धर्मसंसदेमध्ये गांधींना शिव्या देणाऱ्या आणि त्यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करण्यावरुन (Kalicharan Maharaj) सध्या राळ उठलंय. याबाबत सध्या ठिकठिकाणी गुन्हेही दाखल केले जात आहेत. कालीचरण याच्याविरोधात आता अकोल्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या २४ तासांच्या आतच त्याने एक व्हिडीओ जाहिर केला आहे. या विधानांबाबत आपल्याला कसल्याही प्रकारचा पश्चात्ताप नसल्याचं ठाम विधान त्याने केलंय. तसेच मला फासावर लटकावलं तरी मी माझ्या विधानांवर ठामच राहिल, असंही त्याने म्हटलंय.

कालीचरणने (Kalicharan Maharaj) आपल्या व्हिडीओत म्हटलंय की, अशा एफआयआरने मला काहीही फरक पडत नाही. मी गांधीविरोधी आहे आणि गांधींचा मी द्वेष करतो. यासाठी मला फाशीची शिक्षा जरी सुनावली गेली तरी मी ती स्विकारेन. रविवारी रायपूरमधील धर्मसंसदेत स्टेजवरुन कालीचरणने राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच त्यांचा हत्यारा नथुराम गोडसेला नमन केलं होतं.

महात्मा गांधींवर केले आरोप

कालीचरणने महात्मा गांधींवर घराणेशाही वाढवण्याचा आरोप केला. काँग्रेसमध्ये घराणेशाही वाढवण्याचं पाप महात्मा गांधींचंच असल्याचं त्याने म्हटलंय. जर गांधींनी (Mahatma Gandhi) पंडित नेहरुंच्या जागी सरदार पटेलांना पंतप्रधान केलं असतं तर आज देश अमेरिकेपेक्षाही पुढे असता आणि भारत आजही सोने की चिडिया म्हणून ओळखला गेला असता, असं विधान त्याने केलं होतं.

भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या फाशीसाठी महात्मा गांधींच जबाबदार असल्याचे आरोपही त्याने लगावले आहेत. गांधी कुठल्याच देशाचा पिता असू शकत नाही, राष्ट्रपिता बनवायचं असेल तर छत्रपती शिवाजी, राणा प्रताप आणि सरदार पटेल सारख्या लोकांना बनवलं गेलं पाहिजे, ज्यांनी देशाला एकत्र केलं, अशांना राष्ट्रपिता बनवलं गेलं पाहिजे, देशाची फाळणी करणारे गांधी देशाची राष्ट्रपिता असू शकत नाहीत, असं विधान त्याने केलंय.

विखारी धर्मसंसद

१७ ते १९ डिसेंबर दरम्यान हरिद्वारमधील वेद निकेतन धाममध्ये धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं आयोजन उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील डासना मंदिराचे पुरोहित यति नरसिंहानंद यांनी केलं होतं. या धर्मसंसदेत मुस्लीमांविरोधात तसेच देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आहेत. याबाबत आता काही आक्षेपार्ह विधानांवरुन कथित साधूंवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT