under the superstition women cuts her tongue for return of daughter in law at jharkhand 
देश

सुनेसाठी कापली जीभ अन् केली अर्पण...

वृत्तसंस्था

रांची (झारखंड): एका सासूने आपली हरवलेली सून परत मिळावी म्हणून जीभ कापून देवाला अर्पण केली. महिलेच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधश्रद्धेच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

खरसावन जिल्ह्यातील सरायकेला परिसरात ही घटनी घडली. लक्ष्मी निराला या महिलेला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जमशेदपूर येथे हलविण्यात आले आहे. लक्ष्मी यांना सध्या बोलता येत नसले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी या घरकाम करून कुटुंबाला हातभार लावतात. १४ ऑगस्ट रोजी लक्ष्मी यांची सून  ज्योती मुलासह बेपत्ता झाली आहे. त्यांनी शोध घेतला पण न सापडल्यामुळे पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याबाबत तपास सुरू आहे. पण, लक्ष्मी यांनी देवाकडे प्रार्थना सुरू केली. सून सापडावी म्हणून महादेवाच्या मंदिरात गेल्या आणि ब्लेडच्या सहाय्याने आपली जीभ कापून ती अर्पण केली.

लक्ष्मी यांचा पती नंदूलाल म्हणाले, सून आणि नातू बेपत्ता झाल्यापासून लक्ष्मी काळजीत आहे. तिने कोणाच्या तरी सल्ल्यानुसार जीभ देवाला अर्पण केली आहे. अंधश्रद्धेतून ही घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

SCROLL FOR NEXT