Underworld Don Dawood Ibrahim esakal
देश

Dawood Ibrahim भारतावर हल्ला करणार; राजकीय नेते, उद्योगपती Hitlist वर!

सकाळ डिजिटल टीम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं भारताला लक्ष्य करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केलंय.

अंडरवर्ल्ड डॉन आणि फरारी गँगस्टर दाऊद इब्राहिमनं (Underworld Don Dawood Ibrahim) भारताला लक्ष्य करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (National Investigation Agency) उघड केलंय. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, अनेक राजकीय नेते (Political leaders) आणि प्रसिद्ध उद्योगपतींची नावं या 'हिटलिस्ट'वर असल्याचं समजतंय.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एफआयआरमध्ये (FIR) उघड झालंय की, दाऊद इब्राहिम त्याच्या विशेष युनिटसह (Special Unit) देशाच्या विविध भागात हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशानं स्फोटक आणि प्राणघातक शस्त्रं वापरून देशावर हल्ला करण्याची योजना आखत आहे. याशिवाय, दाऊद इब्राहिमचे दिल्ली आणि मुंबईवर विशेष लक्ष आहे. ईडीनं अलीकडेच दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दहशतवादी कारवायांमध्ये आर्थिक मदत केल्याबद्दल मनी लाँड्रिंगचा (Money laundering) गुन्हा दाखल केला होता.

ईडी (ED) इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar), त्याचे साथीदार आणि टोळीतील सदस्यांची चौकशी करणार आहे. शुक्रवारी इक्बाल कासकरला मनी लाँड्रिंग प्रकरणात 24 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ईडीनं न्यायालयाला सांगितलंय की, कासकरच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. कारण, तो मुख्य सूत्रधार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ईडीनं इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर (Haseena Parkar), तसेच गँगस्टर छोटा शकीलच्या नातेवाईकांशी संबंध असलेल्या लोकांच्या मुंबईतील 10 ठिकाणी छापे टाकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT