Narendra Singh Tomar Remark on Farm laws e sakal
देश

कृषी कायदे पुन्हा येणार असं म्हटलंच नाही, केंद्रीय कृषिमंत्र्यांचा यूटर्न

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : तब्बल एक वर्ष चाललेल्या शेतकरी आंदोलनानंतर (Farmer Agitation) पंतप्रधान मोदींनी (PM Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले. पण, आता हेच कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात असं विधान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. मात्र, त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून युटर्न घेत मी असं कधीच बोललो नाही, असं सांगितलं आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. वर्षभर चाललेल्या या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोदींनी अचानक कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांनी संसदेत हे कायदे मागे घेतले. पण, सरकारने कायदे मागे घेतल्यानंतर आम्ही परत कायदे आणू शकतो, अशा कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं काय म्हणाल होते कृषिमंत्री? -

आम्ही कृषी दुरुस्ती कायदा आणला. पण काही लोकांना हा कायदा आवडला नाही. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही मोठी सुधारणा होती. पण, आम्ही ते कायदे मागे घेतले. आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत. मात्र, आम्ही पुन्हा पुढे जाऊ शकतो. कारण शेतकरी हा भारताचा कणा आहे. सरकार पुन्हा हे कृषी कायदे लागू करू शकते असे संकेत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले होते.

केंद्रीय कृषिमंत्र्याचा यूटर्न -

भारत सरकारने चांगले कायदे बनवले होते. पण, काही अपरीहार्य कारणांमुळे आम्ही कायदे मागे घेतले. भारत सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करतेय. मी कृषी कायदे मागे आणू असं कधीच म्हटलं नाही, असं म्हणत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या धुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT