Union Budget 2026 Presentation Date and Time

 

esakal

देश

Budget 2026: मोठी बातमी! २६ वर्षात पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार

Union Budget 2026 Presentation Date and Time : महत्त्वाची माहिती आली समोर! अर्थमंत्री निर्मली सीतारामन १ फेब्रुवारी रोजीच अर्थसंकल्प सादर करणार

Mayur Ratnaparkhe

Nirmala Sitharaman Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) बुधवारी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता दिली आहे.

तर न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, संसदीय दिनदर्शिकेनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करतील. खरंतर अलिकडच्या काळातील हा पहिल्याच केंद्रीय अर्थसंकल्प असेल जो रविवारी सादर केला जाणार आहे.

या आधी २८ फेब्रवारी १९९९ रोजी वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला होता. त्या दिवशी अर्थसंकल्पाची वेळ देखील बदलण्यता आली होती. जुनी परंपरा मोडत त्यावेळी अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर केला गेला होता. त्याआधी अर्थसंकल्पहा सायंकाळी पाच वाजता सादर व्हायचा.

हे दुर्मिळ होते, कारण रविवारी संसदेची सत्रे फार क्वचितच असतात. मात्र राष्ट्रीय महत्त्वासाठी सुट्टी बदलली गेली. तेव्हापासून, १ फेब्रुवारी ही निश्चित तारीख झाली. यानंतर अर्थसंकल्प शनिवारीही सादर केला जात होता, परंतु केवळ १९९९ मध्येच रविवारी तो सादर करण्यात आला होता आणि आता थेट २०२६मध्ये तेच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Elephant Viral Video: अरे बापरे! हत्तीची ही शक्ती पाहून डोळे फुटतील! काही क्षणातच उचलली भारी ट्रॉली, जणू खेळणीच! व्हिडिओ व्हायरल

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

SCROLL FOR NEXT