PM Modi eSakal
देश

Budget Session 2024: 2047च्या 'विकसित भारत'साठी उद्याचं बजेट महत्वाचं; PM मोदींनी दिले मोठे संकेत

Tomorrow's Budget Important for 'Developed India' of 2047; PM Modi gave big signals: १८ व्या लोकसभेचं आजपासून पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचं आजपासून पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प कसा असेल? याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पत्रकारांसमोर बोलताना दिली. यावेळी त्यांनी उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे.

मोदी म्हणाले, "आजपासून देशाच्या बजेट आणि पावसाळी अधिवेशनालाही सुरुवात होत आहे. देशाचं या अधिवेशनावर बारीक असणार आहे. कारण हे अधिवेशन सकारात्मक, सृजनात्मक व्हावं तसंच देशवासियांच्या स्वप्नांना सिद्ध करण्यासाठी एक मजबूत पाया घालणारं असावं असं जनतेला वाटतं आहे"

"मी देशवासियांना ज्या गॅरंटी दिल्या आहेत, त्यांना प्रत्यक्षात आणण्याचं लक्ष्य घेऊन आम्ही पुढे जात आहोत. हे बजेट अमृतकाळातील एक महत्वपूर्ण बजेट आहे. आम्हाला पाच वर्षांसाठी जी संधी मिळाली आहे, आजचं बजेट आमच्या पुढील पाच वर्षांची दिशाही निश्चित करेल. तसेच सन २०४७ अर्थात जेव्हा भारतीय स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हाच आपलं 'विकसित भारता'चं जे स्वप्न आहे, हे स्वप्न पूर्ण करण्याचा मजबूत पाया रचणारं बजेट घेऊन आम्ही उद्या देशासमोर घेऊन येत आहोत"

प्रत्येक देशवासियासाठी ही गर्वाची बाब आहे की, भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या देशांपैकी सर्वाधिक वेगानं पुढे जाणारा देश आहे. गेल्या तीन वर्षात सातत्यानं ८ टक्के वाढीसह आपण पुढे जात आहोत. आज भारताची सकारात्मक दृष्टी, गुंतवणूक आणि कार्यक्षमता एक प्रकारे संधीच्या शिखरावर आहे. हा भारताच्या विकास यात्रेचा एक महत्वाचा भाग आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT