amit shah
amit shah 
देश

ट्रॅक्टर परेडमधील जखमी पोलिसांना अमित शहांची भेट; केली प्रत्येकाची विचारपूस

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्षाचं वातावरण पहायला मिळालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुरुवारी सिव्हील लाईनच्या तीरथराम शाह हॉस्पिटल आणि सुश्रुत ट्रॉमा सेंटरवर जाऊन या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची भेट दिली तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 63 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त किसान गणतंत्र परेड काढली होती. नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून ते रद्दच केले जावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. हे कायदे बनवताना तसेच पारित करताना केंद्र सरकारने विरोधकांना तसेच शेतकऱ्यांना देखील विचारात घेतले नव्हते. तसेच त्यांच्याशी संवाद न साधता, आक्षेप न जाणून घेताच हे कायदे आवाजी मतदानाने संसदेत पारित केले होते. गेल्या दोन महिन्यांत सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या 10 फेऱ्या पार पडल्या असून अद्यापही तोडगा निघाला नाहीये. ऐन कडाक्याच्या थंडीत आणि पावसात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आतापर्यंत 150 हून अधिक शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत.

या परेडदरम्यान आंदोलक आणि पोलिस यांच्यादरम्यान संघर्ष झालेला पहायला मिळाला. काही ठिकाणी आंदोलकांकडून बॅरिकेड्स तोडण्यात आले तर काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर प्रवेश करुन तिथे धार्मिक झेंडा फडकावला होता. या संघर्षात अनेक शेतकरी तसेच पोलिस देखील जखमी झाले होते. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे. 

दिल्ली पोलिस कमिश्नर एस.एन. श्रीवास्तव यांनी बुधवारी म्हटलं की प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या संघर्षात 394 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यात झालेल्या हिंसेसाठी आतापर्यंत 19 लोकांना अटक केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी 25 हून अधिक FIR दाखल केले आहेत. काही पोलिस अधिकाऱ्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना ICU मध्ये देखील भरती केलं गेलं आहे. 

पुढे त्यांनी म्हटलं की, यातील आरोपींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजची मदत घेत आहेत. आतापर्यंत 19 लोकांची अटक आणि 50 लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सध्या सुरु आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT