Amit Shah
Amit Shah esakal
देश

BBC Documentary वर अखेर अमित शाह बोललेच...

सकाळ डिजिटल टीम

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाने मंगळवारी 'सर्व्हे' केला. यावेळी कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेत त्यांना घरी पाठवण्यात आलं. सर्वसामान्यांच्या भाषेत याला आयकराचा छापा असे संबोधले जात आहे. लंडनमधील बीबीसीच्या कार्यालयातून छापेमारीची ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बीबीसी डॉक्यूमेंटरीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Union home minister Amit Shah on BBC documentary on Prime Minister Narendra Modi )

विरोधकांनी या कारवाईचा संबंध बीबीसीच्या बंदी घालण्यात आलेल्या डॉक्यूमेंटरीशी असल्याचं सांगत भाजपवर टीकास्त्र सोडलं. , 'पहिले बीबीसीची डॉक्यूमेंटरी आली. त्यावर बंदी घालण्यात आली आणि आता IT ने बीबीसीवर छापे टाकले आहे. अघोषित आणीबाणी...' असं ट्विट काँग्रेसने केलं.

BBC IT Raid : बीबीसी म्हणजे 'भ्रष्टाचार बकवास कॉर्पोरेशन'; भाजपचा आक्रमक पावित्रा

दरम्यान, एका मुलाखतीत अमित शाह यांनी बीबीसी डॉक्यूमेंटरीवर प्रतिक्रिया दिली आहे. 'बीबीसीवाले 2002 पासून मोदीजींना फॉलो करत आहेत पण प्रत्येक वेळी मोदीजी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि लोकप्रिय होत आहेत.' असं शहा म्हणाले.

बीबीसीने अलीकडेच गुजरात दंगलीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित भूमिकेवर एक डॉक्यूमेंटरी प्रसारित केली होती. यावर भारत सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.

BBC IT Raid : BBC कार्यालयावर IT रेड नव्हे तर, सर्व्हे; जाणून घ्या IT Raid अन् IT Survey मधील फरक

BBC कार्यालयावर IT रेड नव्हे तर, सर्व्हे

सर्वसामान्यांच्या भाषेत याला आयकराचा छापा असे संबोधले जात आहे. मात्र, IT Raid आणि IT Survey यात मोठा फरक आहे. 2002 च्या गुजरात दंगलीवर बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आज दिल्ली आणि मुंबईतील BBC च्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून मंगळवारी दोन्ही शहरांमधील कार्यालयांमध्ये 'सर्वेक्षण' करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT