Central Minister Vishweshwar Tudu Team eSakal
देश

केंद्रीय मंत्र्याचा प्रताप! अधिकाऱ्यांना दरवाजा लावून, हात मोडेपर्यंत मारहाण

आढावा बैठकीदरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप अधिकाऱ्याने केला आहे.

सुधीर काकडे

केंद्रीय मंत्री विश्वेश्वर तुडू (Central Minister Vishweshwar Tudu) यांनी आढावा बैठकीत एका सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत एका अधिकाऱ्याचा हात तुटल्याचं समजतंय. या अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्या हातावर उपचार करण्यात आल्याचं समजतंय. केंद्रीय मंत्री विश्वेश्वर तुडू यांचं मूळ गाव असणाऱ्या ओडिशातील बारीपाडामध्ये ही घटना घडली आहे. विश्वेश्वर तुडू हे केंद्र सरकारमध्ये आदिवासी व्यवहार आणि जलशक्ती राज्यमंत्री आहेत.

विश्वेश्वर तुडू हे मयूरभंजचे भाजप खासदार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळालं. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्हा नियोजन व संनियंत्रण विभागाचे उपसंचालक अश्विनीकुमार मलिक, सहायक संचालक देबाशिष महापात्रा यांना बोलावण्यात आलं होतं. त्यादरम्यान झालेल्या वादानंतर ही घटना घडली आहे.

आढावा बैठकीत मंत्री विश्वेश्वर तुडू एका गोष्टीवरून चांगलेच भडकले आणि त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना आतून दरवाजा बंद करून खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे. या हल्ल्यात देबाशिष महापात्रा यांचा हात तुटला असून, अश्विनी कुमार मलिक जखमी झाले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना बारीपाडा येथील पीआरएम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT