jilebi samosa 
देश

पोलिसांनी जप्त केली दोन क्विंटल जिलेबी आणि 1050 समोसे; दहा जणांना अटक

सकाळवृत्तसेवा

उन्नाव : निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव मानला जातो. ही प्रक्रिया जितकी दर्जेदारपणे राबवली जाईल, तितकाच लोकशाहीचा यथोचित सन्मान समजला जातो. मात्र, यामध्ये अनेक अनुचित प्रकार सर्रास घडताना दिसून येतात. त्यातीलच एक म्हणजे मतदारांना मतासाठी कशाचे तरी गाजर दाखवणे आणि दुसरीकडे मतदारांनीही छोट्या लोभापायी आपलं मत विकून लोकशाहीचीच थट्टा उडवणे. गेले अनेक वर्षे सुरु असलेला हा प्रकार दिवसेंदिवस लोकशाहीला लागलेली कीड बनत चालला आहे. यासंदर्भातच उत्तर प्रदेशमध्ये घडलेली एक घटना हास्यास्पद तर आहेच मात्र विचार करायला लावणारी देखील आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरु आहेत. मात्र, यातील चुरस काही कमी नाहीये. या निवडणुकीत सहभागी झालेले स्थानिक उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. सामान्यत: दारु वाटण्याचा प्रकार तर सर्रास आढळून येत आहेच. मात्र, अशी एक घटना घडलीय जी ऐकून तुम्ही हैराण व्हाल अथवा तुम्हाला हसू फुटेल. उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये पोलिसांनी दोन क्विंटल जिलेबी आणि एक हजारहून अधिक समोसे जप्त केले आहेत. एवढी जिलेबी आणि समोसे हे मतदारांना वाटून त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवाराने बनवले होते. मात्र, वेळीच पोलिसांना याची माहिती मिळाली आणि जिल्हा पोलिसांनी ही जिलेबी-समोसा पार्टी उधळून लावली. 


उन्नाव पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, या जिलेब्या आणि समोसे निवडणुकीला उभ्या असणाऱ्या हसनगंजमधील उमेदवाराने वाटपासाठी बनवल्या होत्या. प्रशासनाने हे आचारसंहितेचं उल्लंघन करणारं प्रकरण असल्याचं ठरवून खटला दाखल केला आहे. तसेच कोरोना प्रोटोकॉलचं उल्लंघन म्हणून देखील गुन्हा नोंद केला आहे. तर दहा जणांना अटक केली गेली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या की दारुच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढते. या निवडणुकीत अलिकडेच लाखों रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. हरियाणामध्ये तयार झालेली ही दारु तब्बल 25 लाखांची असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या प्रकरणी पोलिसांनी 5 तस्करांना अटक देखील केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT