Karnataka Legislative Council Election esakal
देश

भाजप बहुमताच्या एकदम जवळ; कर्नाटक विधान परिषदेवर 7 उमेदवारांची बिनविरोध निवड

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकच्या उच्च सभागृहात भाजपला बहुमत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

बंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेच्या (Karnataka Legislative Council) द्विवार्षिक निवडणुकीत सर्व 7 उमेदवारांची बिनविरोध निवड झालीय. विधान परिषद निवडणूक (Karnataka Legislative Council Election) अधिकारी एम. के. विशालाक्षी यांनी सांगितलं की, 'या 7 जागांसाठी 3 जून रोजी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ 7 उमेदवार रिंगणात राहिले, त्यामुळं सर्वांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं.'

या 7 पैकी भाजपचे 4, काँग्रेस 2 (Congress) आणि JD (S) 1 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळं कर्नाटकच्या उच्च सभागृहात भाजपला बहुमत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे (BJP) उपाध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi), पक्षाच्या राज्य युनिट सचिव हेमलता नायक, एस. केशवप्रसाद आणि अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष सी. नारायणस्वामी यांचा समावेश आहे.

तर, काँग्रेसकडून BMTC चे माजी अध्यक्ष एम. नागराजू यादव आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अब्दुल जब्बार यांची निवड झालीय. JD(S) च्या वतीनं माजी आमदार टी. ए. श्रावण यांची निवड करण्यात आलीय. 14 जून रोजी 7 विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्यानं या जागांवर निवडणूक घेण्याची गरज होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Satara Politics: सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काऊंटडाऊन सुरू; शासनाकडून २० मार्चपर्यंत मुदत, सत्तेच्या कोंडीमुळे वाढली उत्सुकता!

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT