Amit Shah_Yogi Adityanath Skal Media
देश

UP भाजपत कुरबूर; मुख्यमंत्री योगींनी घेतली अमित शहांची भेट!

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरुन भाजपमध्ये कुरबूर सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. याच विषयावर चर्चेसाठी योगी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. (UP CM Yogi Adityanath met Union HM Amit Shah in Delhi)

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यातच सध्या उत्तर प्रदेश भाजपमध्ये अंतर्गत कुरुबुऱ्या सुरु झाल्या आहेत. कोविड काळातील परिस्थिती सरकारकडून योग्य प्रकारे हाताळली गेली नसल्याचं काही भाजप नेत्याचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दिल्ली हायकमांडसोबत गुरुवारी पहिली बैठक पार पडली.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एल. संतोष यांनी अलीकडेच राज्यात योगी सरकारच्या कोविड-१९ संकटकाळातील व्यवस्थापनासंदर्भात दोन दिवसांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी योगी सरकारचं कौतुकही केलं होतं. संतोष यांनी ट्विटरवरुन सांगितलं होतं की, "आदित्यनाथ यांनी २० कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात कोरोनाच्या संकटावर पूर्णपणे मात केली आहे.

दरम्यान, जतिन प्रसाद हे काँग्रेसमधून भाजपत दाखल झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी योगींनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. प्रसाद यांच्याकडं ब्राह्मण समाजाचा चेहरा म्हणूनच पाहिलं जात आहे. जे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण व्होट बँकेवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. ट्विटद्वारे योगींनी प्रसाद यांचं भाजपत स्वागत केलं होतं. प्रसाद यांच्या भाजपत आल्यामुळे उत्तर प्रदेशात पक्ष अधिक मजबूत होईल असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT