Narendra Modi टिम ई सकाळ
देश

Hijab Row: PM मोदी म्हणतात; मुस्लिम महिलांचे अधिकार दाबण्यासाठी...

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: देशात एकीकडे हिजाब प्रकरण पेटलेलं असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. निश्चितच या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटणे स्वाभाविक असून या पार्श्वभूमीवरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहारनपूरमधील एका प्रचार रॅलीमधून संबोधित केलंय. यावेळी त्यांच्या जागेपासून 60 किमी अंतरावर शामली, मुझफ्फरनगरसहित 11 जिल्ह्यांमध्ये लोक पहिल्या टप्प्यासाठी मतदान करत होते. यावेळी मंचावरुन पंतप्रधानांनी सर्वांत आधी पहिल्या टप्प्यातील मतदारांची माफी मागितली. (Narendra Modi)

काय म्हणाले मोदी?

मोदींनी म्हटलं की, मला आनंद वाटतोय की या निवडणुकीमध्ये मी प्रत्यक्षरुपाने तुम्हा सर्वांचं दर्शन करुन प्रचाराची सुरुवात सहारनपुरमधून करत आहे. मी या ठिकाणाहून पहिल्या टप्प्यातील मतदारांची माफी मागतो. माझं हे कर्तव्य होतं की, निवडणुका घोषित झाल्यानंतर मी त्याठिकाणी जावं, मात्र, निवडणूक आयोगाच्या बंदीमुळे मला त्याठिकाणी जाता आलं नाही.

मुस्लिम महिलांबद्दल काय म्हणाले मोदी?

मोदींनी यावेळी म्हटलंय की, मुस्लिम भगिनी आणि मुलींच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. त्यांच्या इच्छा-आकांक्षा दाबण्यासाठी नवनवे मार्ग शोधले जात आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, हे लोक मुस्लिम भगिनींची दिशाभूल करत आहेत जेणेकरुन त्यांचं आयुष्य कायमस्वरुपी मागासच रहावं.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आमचं सरकार प्रत्येक पीडित मुस्लिम महिलेच्या सोबत उभं राहिलं आहे. कुणीही मुस्लिम महिलेवर अत्याचार करु शकणार नाही, यासाठी योगीजींचं सरकार आवश्यक आहे. सबका साथ, सबका विकास हाच यूपीच्या विकासाचा मूलमंत्र आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, भाजपाला विकासासाठी मुलींच्या सहभागाची आवश्यकत सर्वाधिक वाटते. यासाठीच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींना प्राधान्य मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT