up election 2022 mulayam singh yadav daughter in law aparna may join bjp
up election 2022 mulayam singh yadav daughter in law aparna may join bjp google
देश

मुलायमसिंह यादव यांच्या घरात फूट, सूनबाई करणार भाजपमध्ये प्रवेश?

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक (UP Election 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भाजपला गळती लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला. पण, आता भाजपने समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या घरातच फूट पाडल्याचं दिसतंय. मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव (Aparna Yadav) या भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांचा मोठा मुलगा प्रतिक यादव यांच्या पत्नी आहेत. भाजप आणि अपर्णा यादव यांच्यात गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीला काही दिवस बाकी असताना एक निर्णय घेतल्याची देखील माहिती आहे. अपर्णा समाजवादी पक्षात असूनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर स्तुती करताना दिसत होत्या. मूळच्या उत्तराखंडच्या असलेल्या अपर्णा या योगी आदित्यनाथ यांची भेट घेताना अनेकदा दिसून आल्या. आता त्या थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत अपर्णा यादव? -

अपर्णा यादव या मुलायमसिंह यादव यांचा लहान मुलगा आणि अखिलेश यादव यांचा सावत्र भाऊ प्रतीक यादव यांची पत्नी आहे. त्यांनी अपर्णा यांनी २०१७ ची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लखनौ कँट मतदारसंघातून लढवली होती. त्यांना भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून 33,796 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. पण, आता भाजप त्यांना वेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपने शनिवारी १० आणि १४ फेब्रुवारी रोजी मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काही दिवसात भाजप त्यांची दुसरी यादी जाहीर करणार आहे. जर अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर दुसऱ्या यादीमध्ये त्यांचे नाव येण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुलायम सिंह यांचे जवळचे नातेवाईक आणि फिरोजाबादच्या सिरसागंज मतदारसंघाचे आमदार हरि ओम यादव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. हरी ओम यादव यांचा भाऊ राम प्रकाश उर्फ ​​नेहरू यांच्या मुलीचे लग्न मुलायम सिंह यांचे पुतणे रणवीर सिंग यांच्याशी झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT