अमेठी : अमेठी माझे घर आहे, मला अमेठीपासून कोणीही वेगळे करू शकत नाही, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विश्वास व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी प्रियांका माझ्याकडे आली आणि तिने मला लखनौला चलण्यास सांगितले. परंतु मी तिला म्हणालो की, लखनौला जाण्यापूर्वी आपल्या घरी जाऊ इच्छित आहे. अमेठी माझे घर असून मला इथे येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असे राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेठीवासीयांशी (Amethi) संवाद साधताना म्हणाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यादेखील यूपी दौऱ्यावर असून त्यांनी आज अमेठीमध्ये भाषण केलंय. त्यांनी यूपीच्या लोकांना अनेक आश्वासने दिली आहेत. (Uttar Pradesh Assembly Election 2022 latest updates)
प्रियांका गांधी यांनी म्हटलंय की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे आणि छोट्या उद्योजकांचे कर्ज माफ करेल. वीजबिले अर्ध्यापर्यंत माफ करेल. तसेच 20 लाख तरुणांना रोजगारही देण्यात येईल. तर कोरोनाच्या झळा बसलेल्या कुटुंबांना 25 हजार रुपयांनी मदत देखील करण्यात येईल. सध्याच्या या सरकारने तुमची पुरती दिशाभूल केली असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज भाजप हटाव, महागाई भगाव पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. राहुल गांधी म्हणाले की, आपण २००४ मध्ये राजकारणात आला आणि पहिली निवडणूक अमेठीतून लढली. आपण मला राजकारण शिकवले आणि त्याबद्दल आभारी आहे. आज देशासमोर दोन मोठे प्रश्न आहेत. बेरोजगारी आणि महागाई. या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे नाही आणि पंतप्रधानांकडे. आपण काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदीजी हे गंगा नदीत स्नान करत असल्याचे पाहिले असेल. परंतु ते देशात रोजगार निर्मिती का करू शकत नाहीत. रोजगार का थांबला आहे. आपल्या देशातील युवकांना नोकरी का मिळत नाही? असा सवाल त्यांनी केली.
दुसरा प्रश्न म्हणजे महागाई. इतक्या वेगाने महागाई का वाढत आहे. अर्थात नरेंद्र मोदी हे या प्रश्नांचे उत्तर देणार नाहीत. त्यामुळे मी उत्तर देत आहे. देशातील लहान दुकानदार, व्यावसायिक हे रोजगार निर्मिती करतात. त्यावर नोटाबंदीचा निर्णय घेऊन नरेंद्र मोदी यांनी हल्ला केला. त्यानंतर जीएसटी लागू केली. आता कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर मदतीचा हात पुढे केला नाही. त्यामुळे देशात महागाई आणि बेरोजगारी दोन्हीत वाढ होत आहे. मोदी यांनी आपल्या दोन तीन धनाढ्य मित्रांच्या हवाली सर्वकाही केले आहे. मोदी यांनी तीन कृषी कायदे आणले आणि वर्षभरानंतर माफी मागत मागे घेतले. देशाची सुरक्षा धोक्यात आहे. चीनकडून भारतीय हद्दीत गाव वसविण्यात येत आहे. तरी मोदी गप्प आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.