Yogi Adityanath Yogi Adityanath
देश

80-20 टक्क्यांचं वक्तव्य जाती-धर्मासंदर्भात नव्हतं - योगी आदित्यनाथ

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि लोकांच्या आशीर्वादाने डबल इंजिनचं सरकार दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा येईल असा दावाही योगींनी केला आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी य़ावेळी उत्तर प्रदेशात भाजप (BJP) ३०० हून जास्त जागा जिंकेल असा दावा केला आहे. तसंच ही निवडणूक ८० टक्के विरुद्ध २० टक्के अशी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या ८०-२० टक्क्यांच्या प्रतिक्रियेवर स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, हे वक्तव्य धर्म-जातीच्या संदर्भात नाही. ८० टक्के ते लोक जे प्रगतीला पाठिंबा देतात तर २० टक्के ते लोक जे प्रत्येक गोष्टीला विरोध करतात आणि नकारात्मक दृष्टीकोन ठेवतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि लोकांच्या आशीर्वादाने डबल इंजिनचं सरकार दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा येत आहे. निवडणूक ८० विरुद्ध २० अशा मार्गाने आहे. समाजवादी पक्ष, बसपा, काँग्रेस यांना चिंता वाटत आहे आणि पहिल्या टप्प्यानंतर ते बॅकफूटवर आहेत असंही आदित्यनाथ म्हणाले.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपवर निशाणा साधला होता. भाजप थंड झाल्याची टीका त्यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या बाजुने जनतेचा कल नव्हता, लोकांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. लोकं भाजपच्या बाजुने असून जनतेच्या प्रश्नांवर भाजप लढत आहे. आमचं काम मजबूत आहे आणि उद्देश प्रामाणिक असल्याचंही योगींनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT