देश

CM योगींवर टीका; युपीच्या माजी राज्यपालांवर देशद्रोहाचा गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधीत युपी पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधीत युपी पोलिसात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपमानास्पद टीका केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी कुरैशी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.

युपी पोलिसांनी असं म्हटलं की, रामपूर जिल्ह्यातील सिव्हील लाइन्स पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्ते आकश सक्सेना यांचनी दिलेल्या तक्रारीनंतर कुरैशीविरोधात गुन्हा दाखल केला गेला. माजी राज्यपालांवर देशद्रोह (१२४ ए), धर्म आणि जातींमध्ये तणाव वाढवल्याच्या आऱोपाखाली कलम १५३ ए आणि राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला आव्हान देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी १५३ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितलं की, सक्सेना यांनी त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे की, कुरैशी हे माजी मंत्री आजम खान यांच्या घरी आमदार तंजीम फातिमा यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी मुख्यमंत्री योगी सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना ही रक्त पिणाऱ्या राक्षसासोबत केली होती. सक्सेना यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं की, कुरैशी यांचे वक्तव्य हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करू शकते आणि दंगलही होऊ शकते.

रामपूरचे नेते आणि माजी मंत्री आजम खान हे सध्या तुरुंगात आहेत. तसंच कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुरैशी हे उत्तराखंड, मिझोरामचे राज्यपाल होते. तसंच २०१२ ते २०१५ या कालावधीत त्यांच्याकडे उत्तर प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून ते काँग्रेस खासदार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT