Uttar Pradesh CM Yogi Adityanath Team eSakal
देश

"UP सरकार विरोधकांचे फोन टॅप करतंय, CM योगी स्वत: ऐकतात रेकॉर्डींग"

Uttar Pradesh: प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांचे गंभीर आरोप.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सध्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्ष आगामी कळातील विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Elections) दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. हिंदू धर्म सर्वांना प्रामाणिकपणा आणि प्रेम शिकवतो. आरएसएस आणि भाजपचे सदस्य मात्र धर्माच्या नावावर राजकारण करतात अशी टीका आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांचं सरकार विरोधकांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अमेठीत पार पडली. यावेळी राहुल गांधींनी जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आज रायबरेलीतून प्रियंका गांधींनीही भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. सरकारचं काम काय आहे? जनतेच्या समस्या जाणून घेणे, समजून घेणे, त्यावर उपाय शोधणे आणि अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे, ते सोडून हे सरकार विरोधकांचे फोन टॅप करत आहे असा गंभीर आरोप प्रियंका गांधींनी केला.

दरम्यान, समाजवादी पक्षाशी संबंधित सर्वांवर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. नेत्यांचे फोन टॅप करून योगी आदित्यनाथ स्वतः संध्याकाळी रेकॉर्डिंग ऐकतात. जर तुम्ही आमच्याशी संपर्क साधत असाल तर तुम्हीही त्यांच्या रडारवर असं अखिलेश यादव यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT