देश

नरेंद्र गिरींच्या मृत्यूचे गूढ कायम! प्रकरणाच्या CBI चौकशीची शिफारस

सकाळ डिजिटल टीम

प्रयागराज : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्युप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सोमवारी प्रयागराज येथील वाम्घबरी मठात पंख्याला लटकलेला आढळून आला होता. घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली आणि यात त्यांनी आपल्या शिष्यासह तीन जणांवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून सध्या १८ सदस्यीय एसआयटीचे पथक तपास करत आहे.

महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनाने संत परिवाराला धक्का बसला आहे. नरेंद्र गिरी यांना जवळून ओळखणारे संत देखील ते आत्महत्या करू शकत नाहीत, असा दावा करत आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा वारंवार सांगितले जात असून सीबीआय किंवा न्यायिक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली गेली. संतांच्या मते, नरेंद्र गिरी हे आत्महत्या करू शकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर यायलाच हवे. यासाठी उच्चस्तरीय चौकशी गरजेची आहे, अशी मागणी होऊ लागली. समाजवादी पक्ष, कॉंग्रेससह अनेक पक्षांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे खासदार साक्षी महाराजांनी देखील सुसाईड नोटवर प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले, की ज्या व्यक्तीला सही करण्यासाठी बराच वेळ लागत असे, तो मोठी सुसाईड नोट लिहू शकत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.

आनंद गिरीला पदावरून हटविले

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्युप्रकरणी अटकेत असलेला आरोपी आनंद गिरी याला युवा भारत साधू समाज संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविले आहे. युवा भारत साधू समाजाच्या एका शिष्याने म्हटले की, आनंद गिरी हे देश विदेशात भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करत होते. त्यामुळे त्यांना भारत साधू समाज या पदवीने सन्मानित केले होते. परंतु आता त्यांचे नाव नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आल्याने भारतातील संतांनी त्यांना संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. सदस्य लोकेशदास महाराज म्हणाले, की आनंद गिरी यांना हटविण्याचा निर्णय युवा भारत साधू समाजाच्या बैठकीनंतर घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT