Uttar Pradesh Crime News esakal
देश

प्रियकरानं पत्नीलासोबत घेऊन प्रेयसीचा काढला काटा

सकाळ डिजिटल टीम

सुहागिनीनं प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावा येथे एका विवाहित प्रियकरानं आपल्या मैत्रिणीची हत्या केलीय. तिचा गळा चिरुन मृतदेह यमुना नदीत फेकून दिलाय. या हत्येत त्या व्यक्तीची पत्नी आणि एका मित्राचाही सहभाग होता. ही घटना वैदपुरा (Vaidpura) परिसरातील खर्डुली गावामधील आहे.

खर्डुलीत राहणारे रामवीर सिंह यांनी सांगितलं की, त्यांची 21 वर्षीय मुलगी सुहागिनी 7 फेब्रुवारी रोजी घरातून गेली, ती परत आलीच नाही. तिच्या वडिलांनी सुहागिनीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला; पण ती कुठंच सापडली नाही. त्यानंतर त्यांनी 9 फेब्रुवारी रोजी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस तरुणीचा शोध घेत होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केलीय. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मोहन हा व्यवसायानं जेसीबी चालक असून तो अनेकदा कामानिमित्त खर्डुली गावात येत होता. तिथं असतानाच त्याची सुहागिनीशी भेट झाली आणि दोघांमध्ये प्रेम झालं.

सुहागिनीला मारण्याचा रचला कट

मोहनचं आधीच लग्न (2019) झालं होतं. काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं; पण जेव्हा सुहागिनीनं त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, तेव्हा मोहननं उडावा-उडवीची उत्तर दिली आणि तिला मारहाण केली. त्यामुळं सुहागिनीनं त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. मोहन अस्वस्थ झाला आणि त्यानं सगळा प्रकार त्याच्या पत्नीला सांगितला. त्यानंतर राहुल या मित्रासोबत तिघांनी मिळून सुहागिनीला मारण्याचा कट रचला.

सुहागिनीच्या गळ्यावर सपासप वार

७ फेब्रुवारी रोजी मोहननं प्रेयसी सुहागिनीला फूस लावून बदपुरा भागातील यमुना नदीवरील रेल्वे पुलावर नेलं. तिथं आधीच असलेली मोहनची पत्नी आणि मित्र राहुल यांनी मिळून प्रेयसी सुहागिनीचा गळा आवळून खून केला. यानंतर तिघांनीही चाकूनं तिच्या गळ्यावर सपासप वार केला आणि मृतदेह यमुना नदीत फेकून दिला. याविषयी माहिती देताना एसएसपी जय प्रकाश सिंह यांनी सांगितलं की, तिघांनीही आपला गुन्हा कबूल केलाय. तसेच त्यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू, मयताचे कपडे आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पुण्यात बोगस मतदानाचा अजब प्रकार, मतदान केंद्रावर महिला न येतच तिच्या नावाने कोणीतरी दुसरच करून गेलं मतदान

Municipal Election Result: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कधी सुरू होणार? सर्वात जलद निकाल कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

पुन्हा एकदा स्त्रियांवरच सिनेमा का केला? केदार शिंदेंचं ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' बद्दल स्पष्ट भाष्य

Rail Tour Package: भाविकांसाठी खुशखबर! आता फक्त १३ हजारांत श्रीशैलम दर्शन; जाणून घ्या रेल्वे टूर पॅकेज

Sindhudurg ZP : जिल्हा परिषद निवडणुकीत देवगडात मोठी चुरस; आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलली

SCROLL FOR NEXT