UP Crime News esakal
देश

Love Marriage पडलं महागात; मुलाच्या वडिलांची पोटात चाकू भोसकून हत्या

सकाळ डिजिटल टीम

रामप्रवेशच्या मानेवर, चेहऱ्यावर सपासप वार करुन त्याला उसाच्या शेतात फेकून दिलं.

कुशीनगर : पटहेरवा पोलीस स्टेशन (Patherwa Police Station) हद्दीतील अमरवा गावातल्या रामप्रवेश पासवान (Rampravesh Paswan) यांच्या हत्येचं गूढ उकलत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामप्रवेशची हत्या त्याच्या मुलानं पाटीदाराच्या मुलीसोबत प्रेमविवाह (Love Marriage) केल्यामुळं झाली, असं त्यांनी नमूद केलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रामप्रवेशचा मुलगा मार्कंडेय प्रसाद हा पाटीदार श्रीकांत पासवान यांच्या मुलीसोबत तीन वर्षांपूर्वी फरार झाला होता. त्या दोघांनी लग्न केलं, तेव्हापासून दोघांच्या कुटुंबात वैर वाढत गेलं. दोन्ही कुटुंबात छोट्या-छोट्या गोष्टींवरून नेहमी भांडण व्हायची. घटनेच्या महिनाभरापूर्वी आरोपी श्रीकांत पासवानच्या नातवाचं लग्न ठरलं होतं. मात्र, ते लग्न मोडलं. कारण, त्याच्या मुलीनं मार्कंडेय प्रसाद याच्याशी लग्न केलं म्हणून, असं श्रीकांतचं म्हणणं आहे.

लग्न मोडल्यामुळं श्रीकांत पासवान यांचे कुटुंबीय खूपच नाराज झाले होते. याला रामप्रवेश पासवान आणि त्याचा मुलगा जबाबदार आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी श्रीकांतनं कट रचला. गावातील योगेंद्र राय यांनी या कटात श्रीकांतला साथ दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. रामप्रवेश पासवान सरस्वतीचं पूजन करून परतत असताना सच्चिदानंद आणि त्यांची मुलं सुमित कुमार, श्रीकांत पासवान आणि रामाशिष यांनी रामप्रवेशला गावाबाहेर पकडून त्याची हत्या केली. त्याच्या मानेवर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात रामप्रवेशला फेकून दिलं व तिथून पळ काढला. पोलिसांनी योगेंद्र राय, सच्चिदानंद पासवान आणि रामाशिष प्रसाद यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली, त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलंय. पोलिसांनी या तिघांना अटक करून तुरुंगात रवानगी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT