देश

हॉटेलमध्ये पोलिसांच्या छाप्यावेळी तरुणाचा मृत्यू; ६ जण निलंबित

सकाळ डिजिटल टीम

एका हॉटेलमध्ये पोलिसांनी तीन तरुणांकडून वसुलीसाठी छापा टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी एकाचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशात एका हॉटेलमध्ये पोलिसांनी तीन तरुणांकडून वसुलीसाठी छापा टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी एकाचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाच्या पत्नीने पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गोरखपूर इथं फिरण्यासाठी आलेल्या मनीष, प्रदीप आणि अरविंद हे रामगढ ताल परिसरातील कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये थांबले होते. सोमवारी सकाळी ते आठ वाजता या ठिकाणी पोहोचले होते. तर रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिस त्यांच्या रूममध्ये आले. पोलिसांनी यावेळी त्यांचे ओळखपत्र चेक केले. तसंच संबंधित तरुणांचे साहित्यसुद्धा तपासले.

तरुणांचे म्हणणे होते की, इतक्या रात्री झोपमोड करून आमची तपासणी कशासाठी केली जात आहे? आम्ही काय केलं आहे असं विचारताच पोलिसांनी अरविंद नावाच्या तरुणाला मारहाण करून बाहेर काढलं. अरविंदने म्हटलं की, जेव्हा तो बाहेर उभा होता तेव्हा आत मनीषला मारहाण सुरु होती. मनीषच्या चेहऱ्यावर नंतर रक्तही होतं. पोलिसांनीच त्याला गाडीत घालून रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी मनिषला मृत घोषित केलं.

राणा प्रताप चंद या गोरखपूरमधील रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, तीन तरुण त्यांचे मित्र आहेत. त्यांना भेटण्यासाठी इथे आले होते. मात्र पोलिसांनी बाहेरचे असल्याचं समजून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी घुसले. यावेळी तरुणांनी विऱोध केल्यानं हा मारहाणीचा प्रकार घडला असावा.

मनीषच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याची पत्नी कानपूरवरून गोरखपूरला पोहोचली. तिने म्हटलं की, 'पतीने मला फोनवर पोलिस मारहाण करत असल्याचं सांगितलं. तसंच जेव्हा पुन्हा फोन केला तेव्हा उचलला नाही.' मनीषच्या पत्नीने पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि कारवाईची मागणी केली. त्यानंतर तडकाफडकी ६ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT