Accident News Esakal
देश

Accident News : कार-ट्रकचा भीषण अपघात! एका कुटुंबातील ४ तर एकूण आठ जणांचा मृत्यू

A terrible car-truck accident...

रवींद्र देशमुख

वाराणसी - उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बुधवारी वाराणसी-लखनऊ महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी चार जण एकाच कुटुंबातील होते. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

फुलपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक राणावत यांनी सांगितले की, वाराणसी-लखनौ महामार्गावरील कारखियाव परिसरात हा अपघात झाला. या अपघातात कारमधील आठ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस स्टेशन प्रभारी यांनी सांगितले की, मृतांमध्ये विपिन यादव (32) आणि त्यांची आई गंगा देवी (48) पिलीभीत महेंद्र पाल (४३), त्यांची पत्नी चंद्रकाली (४०), भाऊ दामोदर प्रसाद (३५) मेहुणी निर्मला देवी (३२) राजेंद्र (55) आणि कार चालक अमन (24) यांचा समावेश आहे. कुटुंबातील ज्येष्ठांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी हे सर्व गेले होते.

राणावत म्हणाले की, दामोदर यांचा ९ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांविषयी शोक व्यक्त केला. तसेच जिल्हा प्रशासनाकडे जखमी मुलावर योग्य उपचार करण्याच्या सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT