Kapil Sibal
Kapil Sibal Team eSakal
देश

काँग्रेस शिवाय युपीए म्हणजे, आत्मा नसलेलं शरीर - कपिल सिब्बल

सुधीर काकडे

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसरी आघाडी तयार करण्याचा अनुषंगाने हालचाली सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. ममता बॅनर्जीं यांनी यूपीएबाबत केलेल्या एका वक्तव्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसशिवाय युपीएला काहीही अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे. कपिल सिब्बल यांनी ट्विट करून लिहिले की, काँग्रेसशिवाय युपीए म्हणजे आत्मा नसलेलं शरीर असेल.

संयुक्त पुरोगामी आघाडीबद्दलच्या या चर्चा सुरू असतानाच कपिल सिब्बल यांनी विरोधकांची एकजूट दाखवण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं आहे. तसेच सिब्बल यांनी ममता बॅनर्जी यांना यूपीएमध्ये काँग्रेसचे महत्त्व काय आहे, हे सांगण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा झाली. त्याचवेळी या बैठकीनंतर शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवायचे आहे का, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की यूपीए? आता युपीए नाही का? यूपीए म्हणजे काय? आम्हाला एक मजबूत पर्याय हवा आहे. या वक्तव्यातून ममता यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. त्यानंतर देशभरात या विषयावर चर्चा सुरू होती. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका होतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT