UPSC Exam  esakal
देश

UPSC Prelims Exam Result : युपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

UPSC Prelims Exam Result : उत्तीर्ण उमेदवार आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.

Amit Ujagare (अमित उजागरे)

UPSC Prelims Exam Result : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास झाले आहेत त्यांना आपला निकाल upsc.gov.in या आयोगाच्या अधिकृत वेबसाईट पाहता येईल. उत्तीर्ण उमेदवार आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.

परीक्षेच्या नियमानुसार, पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सिव्हिल सेवा (मुख्य) परीक्षा, २०२४ साठी स्वतंत्र अर्ज (DAF-I) करावा लागणार आहे. या अर्जाच्या तारखा आणि इतर महत्वाच्या सूचना आयोगाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर केले जाणार आहेत. पुढे मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुलाखतीसाठी पात्र ठरतील.

युपीएससी पूर्वी परीक्षा १६ जून रोजी देशभरात घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ४०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रकारचे दोन पेपर होते. युपीएससीनं परीक्षा घेण्यापूर्वीच जाहीर केलं होतं की, पूर्व परीक्षेतील जनरल स्टडिज पेपर २ मधील किमान ३३ टक्के बरोबर उत्तर आणि जनरल स्टडिज पेपर १ मधील एकूण गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) यांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT