IAS Tina Dabi esakal
देश

IAS टीना दाबी होणार महाराष्ट्राची सुनबाई; तिचा जोडीदार कोण आहे माहितीय?

सकाळ डिजिटल टीम

आयएएस टीना दाबीनं यापूर्वी 2018 मध्ये अतहर खानशी लग्न केलं होतं.

जयपूर : राजस्थान केडरची 2016 बॅचची IAS आणि UPSC टॉपर असलेली टीना दाबी (IAS Tina Dabi) पुन्हा लग्न करणार आहे. टीना दाबीचा भावी जोडीदारही आयएएस आहे. प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) असं त्याचं नाव असून तो 2013 बॅचचा आयएएस आहे. दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकत्र फोटो शेअर केलेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघं 22 एप्रिलला जयपूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजतंय.

आयएएस टीना दाबीनं यापूर्वी 2018 मध्ये अतहर खानशी लग्न केलं होतं. हे लग्न दोन वर्षांहून अधिक काळही टिकलं नाही. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीनं घटस्फोट घेतला. टीना दाबीचा होणारा नवरा प्रदीप हा महाराष्ट्रात जन्मला असून तो चुरू जिल्ह्याचा कलेक्टरही आहे. यूपीएससी करण्यापूर्वी प्रदीप यांनी एमबीबीएस केलं होतं.

टीना दाबी आणि प्रदीपनं इंस्टाग्रामवर एकत्र फोटो शेअर केलेत. या फोटो कॅप्शनमध्ये टीनानं लिहिलंय, ‘तुमच्यामुळं माझ्या आयुष्यात आनंद पुन्हा परत आलाय’, असं तिनं म्हंटलंय. कॅप्शनसोबत Fiance असा हॅशटॅगही टीनानं दिलाय. दोघांनी लाल रंगाचे कपडे घातलेले दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप गावंडे यांचंही हे दुसरंच लग्न आहे. टीना दाबी ही मूळची दिल्लीची आहे. गेल्या वर्षी तिची बहीण रिया दाबी हिनंही पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली होती. रिया ही UPSC उत्तीर्ण करणाऱ्या सर्वात तरुण उमेदवारांपैकी एक ठरलीय. तिनं वयाच्या 23 व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT