US NAVY 
देश

याला काय समजावं! परवानगीशिवाय अमेरिकेच्या नौसेनेचे लक्षद्विपमध्ये ऑपरेशन

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अमेरिकेच्या नौसेनेने भारताच्या एक्सक्लूझीव इकॉनॉमिक झोनमध्ये परवानगीशिवाय ऑपरेशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वत: अमेरिकेच्या ७ व्या फ्लीटने ७ एप्रिलला जारी केलेल्या वक्तव्यात ही माहिती दिली आहे. अमेरिकेच्या ७ व्या फ्लीटने स्व:ता सांगितलंय की, त्यांनी भारताच्या परवानगीशिवाय ऑपरेशन पार पाडले आहे. अमेरिकेचे हे ऑपरेशन भारताच्या मेरिटाईम सेक्युरेटी पॉलिसीच्या विरोधात आहे. अमेरिकेच्या नौसेनेनुसार हे ऑपरेशन लक्षद्वीपपासून १३० नॉटिकल मैल दूर पश्चिमेला करण्यात आले आहे. ७ वी फ्लीट अमेरिकेची सर्वात मोठी नौदल फ्लीट आहे. विशेष म्हणजे हीच तुकडी अमेरिकेने १९७१ मध्ये बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान भारतावर दबाव आणण्यासाठी बंगालच्या खाडीमध्ये पाठवली होती. 'द वायर'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

भारतीय नौसेनेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, समुद्र लाभलेला कोणत्याही देशाच्या एक्सक्लूझिव इकॉनॉमिक झोनची सीमा समुद्र किनाऱ्यापासून २०० नॉटिकल मैल म्हणजे ३७० किलोमीटर अंतरापर्यंत असते. या सर्व भागावर, समुद्रातील प्रत्येक संसाधनावर संबंधित देशाचा अधिकार असतो. अशा कोणत्याही भागामध्ये मिलिट्री ऑपरेशनसाठी भारताची परवानगी आवश्यक असते. अशाच प्रकारचे कृत्य अंदमान निकोबारमध्ये चीनच्या नौसेनेने २०१९ मध्ये केले होते. त्यावेळी भारताने चीनला याबाबत ठणकावलं होतं. 

आतापर्यंत या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालय किंवा अन्य अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेच्या ७ व्या फ्लीटकडून सांगण्यात आलंय की, 'अमेरिकी नौसेना इंडो-पॅसिफिक रीजनमध्ये प्रत्येक दिवशी ऑपरेशन करते. हे सर्व ऑपरेशन आंतरराष्ट्रीय कायद्यांना लक्षात घेऊन केले जातात. कोणत्याही ठिकाणी ऑपरेशनला सामोरे जाण्यासाठी असं केलं जातं.' अमेरिकेच्या नौसेने पुढे म्हटलं की, 'नियमितपणे फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन ऑपरेशन आमच्याकडून केलं जातं. याआधीही आम्ही असं केलंय, आणि पुढेही करत राहू. हे केवळ एका देशाशी संबंधित नाही.' अमेरिकी नौसेना अशा प्रकारचे ऑपरेशन वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रामध्ये सुद्धा करत असते. 

माजी नौदल अधिकाऱ्याने अमेरिकेच्या कृतीवर उपस्थित केले प्रश्न
माजी नौदल अधिकारी अरुण प्रकाश यांनी ट्विट करुन म्हटलंय की, अमेरिकेकडून दक्षिण चिनी समुद्रात करण्यात आलेले फ्रीडम ऑफ नेविगेशन ऑपरेशन चीनला उत्तर देण्यासाठी म्हणून पाहिलं जातं होतं. त्यामुळे अमेरिकी नौसेनेने भारतीय हद्दीत ऑपरेशन करुन कोणता संदेश दिलाय?


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT