Modi Biden 
देश

'क्लायमेट समिट'मध्ये PM मोदी होणार सहभागी; जो बायडन यांचं स्विकारलं निमंत्रण

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो  बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या 22 आणि 23 एप्रिल रोजी व्हर्च्यूअली होणाऱ्या 'क्लायमेट समिट'मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाद्वारे याबाबतची माहिती देताना सांगण्यात आलंय की, पंतप्रधान मोदींनी या निमंत्रणाचा स्विकार केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, क्लायमेटवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत जॉन केरी 5 ते 8 एप्रिल या दरम्यान दिल्ली दौरा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर माहिती देत भुमिका स्पष्ट केली. या दरम्यान मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्यानमार प्रकरण, पाकिस्तानशी व्यापार आणि कोरोना लसीकरणासहित इतर अनेक मुद्यांवर चर्चा केली. 

लडाख मधील तणाव प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी म्हटलं की, आम्हाला आशा आहे की, चीन उर्वरित भागातून देखील सैन्य वापसी करण्याबाबत सकारात्मक पावले उचलेल. दोन्ही पक्ष सैन्य तसेच राजकीय माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. 

लसीच्या निर्यातीवर निर्बंध नाहीत
इतर देशांना कोरोना लसीच्या पुरवठ्याबाबत बागची यांनी सांगितलं की, भारताने आतापर्यंत जगातील 80 हून अधिक देशांना कोरोना लसीचा पुरवठा केला आहे. त्यांनी हे स्पष्ट केलं की, भारत सरकारने कोरोना लसीच्या निर्यातीवर कसल्याही प्रकारचे निर्बंध लावलेले नाहीयेत. 

यासोबतच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मानवाधिकारांवरील रिपोर्टमधील भारताच्या उल्लेखावर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, हा पूर्णपणे अमेरिकेचा अंतर्गत मामला आहे. आणि यामध्ये आम्ही सहभागी होत नाहीयेत. अशा प्रकरणामध्ये भारतात होणाऱ्या घटनांची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

लाँच होतीये Motorola Edge 70 Max सिरिज; तब्बल 5 स्मार्टफोनचं पॅकेज, प्रीमियम फीचर्स अन् परवडणारी किंमत फक्त...

Eknath Shinde Aditya Thackeray : "कोण होतास तू, काय झालास तू... अरे वेड्या, असा वाया गेलास तू" एकनाथ शिंदेची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

Mumbai News: प्रवाशांचे हाल संपणार! हार्बर मार्गावरील तीन स्थानके मध्य रेल्वेची होणार, कोणती आणि का?

Latest Marathi News Live Update : "चंद्रकांत पाटील पालकमंत्री असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती" - खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा गोरेंवर टोला

SCROLL FOR NEXT