S. Jaishankar
S. Jaishankar esakal
देश

अमेरिकेमुळे भारत पाकिस्तानचे युद्ध, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मोठे वक्तव्य

धनश्री ओतारी

अमेरिकेच्या समर्थनामुळे भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडत आहेत. असा आरोप भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी केल आहे.

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांना भडकावणे आणि शस्त्रे पुरवणे आणि खोऱ्यातील शांतता बिघडवणे या सर्वा बाबींवर जयशंकर यांनी भाष्य केले.

अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी गुरुवारी पाकिस्तानला अमेरिकेचा भागीदार म्हटले होते. "पाकिस्तान हा आमचा भागीदार आहे आणि आम्ही ती भागीदारी पुढे नेण्यासाठी मार्ग शोधू. आमच्या हितासाठी आणि आमच्या परस्परांच्या हितासाठी एकमेकांना पाठिंबा देऊ. असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी केले.

हितासाठी एकमेकांना पाठिंबा देऊ. असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी केले.

यापूर्वी मे महिन्यात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या दौऱ्यावर होते.

यासर्व घडामोडीवर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी यावर भाष्य केले. भारताने सातत्याने सीमेवर वर शांतता असावी असे म्हटले आहे. भारताचा अमेरिकेसोबतचा इतिहास अडचणीचा आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानसोबतच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. असे वक्तव्य जयशंकर यांनी केले.

तसेच, अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानसोबतच्या आपल्या अनेक समस्या आहेत. पण आज अमेरिका एक वेगळा दृष्टीकोन घेण्यास सक्षम आहे, जी खरोखरच म्हणते की, भारताचा रशियाशी वेगळा इतिहास आणि संबंध आहेत, जे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

रशियासोबतचा भारताचा इतिहास अमेरिका, जपान किंवा ऑस्ट्रेलियासोबतच्या इतिहासापेक्षा वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाची स्थिती समान नसते. तसे झाले तर पाकिस्ताननेही आमच्यासारखीच भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. असे जयशंकर यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT