Eric Garcetti 
देश

USA on Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात अमेरिकेकडून हस्तक्षेपाची तयारी; काँग्रेसकडून केंद्रावर हल्लाबोल

गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु असून यामध्ये आत्तापर्यंत सुमारे १३५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण अद्यापही इथली परिस्थिती निवळेली नाही. यापार्श्वभूमीवर आता अमेरिकेनं मणिपूरप्रश्नी लक्ष घालण्याची तयारी भारताकडं बोलून दाखवली आहे. पण यामुळं काँग्रेसनं केंद्र सरकारवर हल्लोबोल केला आहे. (USA on Manipur Violence America says we are ready to establish peace in Manipur Congress attack on Centre)

अमेरिकेची हस्तक्षेपाची तयारी

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी मणिपूरच्या हिंसाचारावर बोलताना म्हणाले की, "मला वाटत नाही की ही समस्या धोरणात्मक बाबींमधून तयार झाली आहे, ही काही समुदयातील मानवी संघर्षातून निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारात जेव्हा लहान मुलं किंवा व्यक्ती मारली जातात तेव्हा या प्रश्नावर काळजी व्यक्त करण्यासाठी तुम्ही भारतीय असण्याची गरज नाही. याबाबत भारत सरकारनं आम्हाला विचारल्यास आम्ही कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार आहोत. (Marathi Tajya Batmya)

ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये खूप प्रगती झाली आहे. आम्हाला माहित आहे की, ही भारताची अंतर्गत बाब आहे. आम्ही त्यासाठी प्रार्थना करतो की मणिपूरमध्ये लवकर शांतता यावी. कारण या भागात शांतता कायम राहिल्यास आम्ही अधिक सहकार्य, अधिक प्रकल्प, अधिक गुंतवणूक आणू शकतो" (Latest Marathi News)

काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल

दरम्यान, अमेरिकेच्या राजदुतांकडून भारताच्या अंतर्गत प्रश्नावर मदत करण्याची भूमिका बोलून दाखवल्यानं काँग्रेस केंद्रावर हल्लाबोल करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना टार्गेट केलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेला हे स्पष्ट शब्दांत सांगतील का? की मणिपूरप्रकरणात अमेरिकेला कुठलीही भूमिका मांडण्याची गरज नाही. मणिपूरमध्ये शांतता आणि सद्भावना पुन्हप्रस्थापित करण्याची जबाबदारी विशेष करुन केंद्र सरकार, राज्य सरकार, सिव्हील सोसायटी तसेच राज्यातील राजकीय पक्षांची आहे.

या प्रश्नावर पंतप्रधान गप्प आहेत तसेच गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. याचा अर्थ असा नाही की मणिपूरमध्ये इतर कोणत्या देशासाठी गुंतवणुकीच्या संधी नाहीत. मणिपूरचा संघर्ष हा भारतापुढील आव्हान आहे. याला भारतीयांकडूनच संवेदनशीलता आणि दृढ विश्वासानं निपटावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT