Utpal Parrikar Goa Election 2022 Sakal
देश

उत्पल पर्रिकर माघार घेण्यास तयार; भाजपला दिला 'हा' पर्याय

भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत उत्पल पर्रिकर यांनी पणजीमधून अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : पक्षाविरोधात बंड पुकारुन पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पणजीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. पण यासाठी त्यांनी भाजपला (BJP) एक पर्याय सुचवला आहे. यावर भाजपनं विचार केला तरच आपण माघार घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Utpal Parrikar ready to withdraw from Panaji Constituency given an option to BJP)

पर्रिकर म्हणाले, "पणजी मतदारसंघातून लढणं हा माझा सैद्धांतिक मुद्दा आहे. मी कालच म्हटलं होतं की, भाजपनं जर गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या प्रामाणिक उमेदवाराला पणजी मतदारसंघातून उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून माघार घ्यायला तयार आहे" भाजपनं पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंड करत भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच आपण पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर केलं होतं. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिग्गज नेते दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र आहेत.

दरम्यान, पर्रिकर यांना उमेदवारी नाकारताना भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, भाजप नेत्याचा मुलगा म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही तर निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच भाजप उमेदवारी देईल. मात्र, या विधानावरुन पर्रिकर आणि फडणवीस यांच्यामध्ये चांगलंच वाक् युद्ध रंगलं होतं.

तसेच उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात आपण उमेदवार देणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली होती. याद्वारे त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आपचे संघटक अरविंद केजरीवाल यांनी देखील पर्रिकर यांना आपमध्ये सामिल होण्याची ऑफर दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT