Shivpal Yadav esakal
देश

योगींना रोखण्यासाठी अखिलेशनं उपसलं युतीचं अस्त्र

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राजकीय वैर विसरून समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) आपल्या काकांच्या प्रगतीशील समाजवादी पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय. तशी त्यांनी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही केलीय. काका शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांच्यासाठी ही दिवाळीची मोठी भेट मानली जात आहे.

कारण, शिवपाल सिंह सपासोबत युती करण्यात बराच काळ गुंतले होते आणि सतत वक्तव्येही करत होते. पण, आज अखिलेश यादव यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलंय. अखिलेश म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत सपा काकांच्या प्रगतीशील समाज पक्षासह प्रादेशिक पक्षांसोबत युती करणार आहे. 22 नोव्हेंबरला मुलायम सिंह यांच्या वाढदिवसापूर्वी अखिलेश यादव काकांसोबत युती करण्याची घोषणा करू शकतात, असं मानलं जात होतं. पण, त्यापूर्वीच घोषणा करून अखिलेश यांनी काकांना दिवाळीची भेट दिलीय.

काकांना पूर्ण सन्मान देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सध्या शिवपाल सिंह यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे. कारण, ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी लढत होते. राज्यात पीएसपीचे विलीनीकरण व्हावं, यासाठी सपा त्यांच्यावर दबाव आणत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून काका-पुतण्यांमध्ये राजकीय वैर आहे. मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे युद्ध संपुष्टात येऊ शकतं, असं मानलं जात होतं. मात्र, अखिलेश यादव यांनी दिवाळीपूर्वीच युतीची घोषणा करुन यावर शिक्कामोर्तब केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT