Yogi Adityanath Team eSakal
देश

योगींना दुसरा झटका! आणखी एका मंत्र्याने दिला राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) मोठी बातमी समोर येतेय. योगी सरकारला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता पुन्हा एक झटका भाजपला बसला आहे. योगी सरकारमधील मंत्री दारा सिंह चौहान यांनी आता मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. याआधी कालच मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदाचा राजीनामा देत भाजप पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांच्याशिवाय आणखी तीन आमदारांनी काल पक्षाला अलविदा केला आहे. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

आज आणखी एका महत्त्वाच्या नेत्याने भाजपची साथ सोडली आहे. दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवत म्हटलंय की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये वन , पर्यावरण आणि उद्यान मंत्री म्हणून मी मनोभावे काम केलं. मात्र सरकारने दलित, वंचित, शेतकरी आणि बेरोजगारांची घोर उपेक्षा करण्यात आली आहे. त्यामुळेच त्रासून मी हा मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT