JP Nadda and Yogi Adityanath
JP Nadda and Yogi Adityanath Sakal
देश

भाजपच्या पाऊणशे आमदारांवर टांगती तलवार

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तयारीला विलक्षण वेग देणाऱ्या भाजप (BJP) नेतृत्वाने तिकीट (Ticket) वाटपाची ठोस पूर्ववतयारीही सुरू केली असून आगामी निवडणुकीत समाधानकारक कामगिरी नसणाऱ्या किमान सत्तारूढ ७५ आमदारांचे यंदा तिकीट कापण्याची वेळ येऊ शकते. (Uttar Pradesh BJP MLA Ticket Issue Politics)

भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा यांनी गेले दोन दिवस उत्तर प्रदेशातील भाजप खासदारांशी चर्चा केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व दोन्ही मुख्यमंत्री यावेळी हजर होते. वाराणसीचे खासदार व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही काल काही काळ व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाल्याचे कळते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांचे जे भीषण हाल झाले त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तमाम खासदारांना नजीकच्या काळात आपापल्या मतदारसंघांत ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने दिले आहेत. जनतेशी कायम संवाद ठेवावा, असेही त्यांना बजावण्यात आले आहे. हेच निर्देश आमदारांसाठी आहेत आणि इथेच खरी मेख आहे. सूत्रांनी ‘सकाळ’ला दिलेल्या माहितीनुसार, सत्तारूढ पक्षाने उत्तर प्रदेशात अलीकडे एका खासगी संस्थेकडून भाजपच्या ३०५ आमदारांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण केले गेले.

या खासगी संस्थेच्या तर्फे प्रत्येक मतदारसंघात नागरिकांच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. गोपनीय पद्धतीने सारी प्रक्रिया पार पडली व संबंधित बहुतांश आमदारांनाही याची कल्पना नव्हती. उत्तर प्रदेश केवळ २०२२ च्या नव्हे तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही कळीचे राज्य असल्याने भाजप व संघपरिवार थोडाही धोका स्वीकारण्यास तयार नाही. आमदारांच्या कामगिरीबद्दल संघानेही वेगळा फीडबॅक घेतला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही वेळोवेळी आमदारांशी चर्चा करून विकास कामांचा आढावा घेतला आहे. या सर्व मंथनानंतर सुमारे ५० ते ७५ आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. आमदारांचे हे रिपोर्ट कार्ड काटेकोरपणे व पूर्णतः त्यांच्या कामगिरीच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. यात व्यक्तिगत भाग नाही, असे सूत्रांनी नमूद केले. जनतेशी ज्यांचा कनेक्ट नाही त्या आमदारांवर टांगती तलवार आहे. मतदारांशी तुटकपणे, उद्धटपणे वागणे, मोदी व योगी सरकारचा प्रभावी प्रचार न करणे, जनतेची कामे न करणे तसेच ज्यांची प्रतिमा भाजप कार्यकर्ते व संघपरिवारात अजिबात मतदारसंघांत चांगली नाही त्यांचाही यात समावेश आहे.

कानपूर-बुंदेलखंड प्रभागात २५ आमदार धोक्यात?

एकट्या कानपूर-बुंदेलखंड प्रभागातील ५२ पैकी ४७ जागा सध्या भाजपकडे आहेत व यातील सुमारे २५ आमदारांची तिकिटे धोक्यात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पक्षाच्या व पक्षनेतृत्वाच्या प्रतिमेपेक्षा भाजपमध्ये काहीही मोठे नाही. ज्यांच्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे त्या खासदारांना माफ करण्याच्या मनःस्थितीत दिल्लीचे नेतृत्व नाही. तिकिटे कापल्यावर भाजपमध्ये मोठी बंडखोरी होणार, हेही पक्षनेतृत्वाने गृहीत धरले आहे व त्यादृष्टीनेही पक्षाने तयारी सुरू केली आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT