Mayawati 
देश

मायावतींना धक्का! बसपाच्या 9 आमदारांची बंडखोरी

कार्तिक पुजारी

बहुजन समाज पक्षाच्या 9 आमदारांनी बंडखोरी केली आहे. सर्व बंडखोर आमदार समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे

लखनऊ- उत्तर प्रदेशातून एक मोठी बातमी हाती येत आहे. बहुजन समाज पक्षाच्या 9 आमदारांनी बंडखोरी केली आहे. सर्व बंडखोर आमदार समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. बसपाचे 9 बंडखोर आमदार अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. (utter Pradesh bsp mayawati 9 mla rebels will join sp akhilesh yadav)

पुढीलवर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका संभावित आहेत. मागच्या विधानसभेवेळी बसपा आणि सपाने एकत्र निवडणूक लढवली होती. पण, आता दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांच्या युतीला निवडणुकीत यश मिळालं नाही. तेव्हापासून अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता होती. आता निवडणुकीला 8-9 महिने राहिले असताना बसपाच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. बंडखोर आमदार समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीर उत्तर प्रदेशात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता बसपा आमदारांच्या बंडखोरीने राजकीय वातावरण तापत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, येत्या काळात उत्तर प्रदेशातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT