yogi adityanath  
देश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

पोलीस प्रशासनानं अलर्ट जाहीर केला असून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या कन्ट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे. हा मेसेज मिळताच पोलीस प्रशासनानं अलर्ट जाहीर केला आहे. तसेच याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा मेसेज कुठल्या क्रमांकावरुन आला याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी कन्ट्रोल रुमच्या ११२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाचव्या दिवशी जीवे मारण्यात येणार आहे, अशी धमकी देण्यात आली. हा धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यानं म्हटलं की, "या चार दिवसांत माझ्यावर काय कारवाई करायची आहे ती करुन दाखवा." हा मेसेज आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती कन्ट्रोल रुमचे ऑपरेशन कमांडरच्या मुख्यालयाला दिली. त्यानंतर वरिष्ठ पातळीपर्यंत अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

ऑपरेशन कमांडरच्या आदेशानुसार, सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ज्या क्रमांकावरुन हा मेसेज आला आहे तो ट्रेस करण्याची आणि धमकी देणाऱ्याला शोधण्यासाठी पथकं नेमले आहेत.

यापूर्वीही मिळाली आहे धमकी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर, सप्टेंबर आणि मे महिन्यात ११२ या कन्ट्रोल रुमच्या क्रमांकावर धमकीचे फोन आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदी रेशन कार्डला रामराम; महाराष्ट्रात आता मिळणार स्मार्ट रेशन कार्ड; QR कोडयुक्त कार्डला मंजुरी

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

मला वाटलं माझी भूमिका संपली... काही दिवसांपूर्वीच एक्झिट; आता 'कमळी' मालिकेत अभिनेत्रीची पुन्हा एंट्री; कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : कडेकोट बंदोबस्तात ताहिर हुसेन आणि इतर १० आरोपींना न्यायालयात आणण्यात आले

Pali Heavy Rain : बळीराजाचे डोळे ओले! अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भातशेती संकटात

SCROLL FOR NEXT