Police
Police  esakal
देश

पोलिसांची क्रूरता! तरुणाला इलेक्ट्रिक शाॅक्स दिले, प्रकृती चिंताजनक

सकाळ डिजिटल टीम

बरेली : पोलिस अधिकारी, चार काँस्टेबल आणि दोन अनोळखी व्यक्तींवर तरुणाचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. सदरील व्यक्ती जनावरांच्या कत्तल प्रकरणातील संशयित होता. ही घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बदाऊ येथे घडली. पोलिस उपनिरीक्षक सत्या पाल आणि त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या मुलाच्या गुद्दद्वारात काडी टाकून आणि त्याला वारंवार इलेक्ट्रिक शाॅक्स दिल्याचा आरोप त्या २२ वर्षांच्या तरुणाच्या आईने केला. वरिष्ठ पोलिस (Police) अधीक्षक ओ.पी. सिंह यांनी दतगंजचे मंडळ अधिकारी प्रेम कुमार थापा यांना सदरील घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. (Uttar Pradesh Cops Torture Man, Give Electric Shocks)

एसपी (शहर) प्रवीणसिंह चौहान म्हणाले, पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये प्राथमिक चौकशी दरम्यान तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. आम्ही त्यांच्याविरुद्ध गैरवर्तन आणि छळ केल्याप्रकरणी एफआयआर नोंदविला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी त्यांना निलंबित केले जात आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्ष होण्यास मदत होईल. पीडित व्यक्तीला योग्य उपचारासाठी मदत केली जात असल्याचे चौहान म्हणाले.

पीडित हा अर्धवेळ भाजीविक्रेता आहे. तो रुग्णालयात असून प्रकृती अस्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्याला पोलिसांनी २ मे रोजी संशयावरुन पकडले. त्याच्यावर गँगस्टरबरोबर जनावरांच्या हत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित हा काक्रला भागात राहतो. त्याच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांना डाॅक्टरांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT