Marriage Esakal
देश

...आणि त्यावेळी मुलाला समजलं आपलं लग्न तृतीयपंथीयाबरोबर झालय

सासू-सासऱ्यांविरोधात FIR

दीनानाथ परब

कानपूर: लग्न (marriage) म्हणजे फक्त दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांच मिलन. लग्नाच्या पवित्र नात्यात विश्वास खूप महत्त्वाच असतो. पण काही वेळा लग्न लवकर उरकायचं आहे, म्हणून वधू किंवा वर पक्षाकडून संपूर्ण माहिती दिली जात नाही. यामध्ये विश्वासाला तडा जातो आणि संसाराची वेल बहरण्याआधीच विस्कटून जाते. आपली फसवणूक झालीय हे लक्षात येतं. असाच प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) घडला आहे. या प्रकरणात नवरदेवाने सासू-सासरे आणि मध्यस्थाविरोधात पोलीस ठाण्यात FIR नोंदवला आहे. (Uttar Pradesh Kanpur man files FIR against his in-laws for misleading him to marry a transgender)

नेमकं काय घडलं?

तक्रारदाराचे २८ एप्रिलला लग्न झाले. लग्नानंतर शरीरसंबंध प्रस्थापित करताना त्याला पत्नीची खरी स्थिती कळली. त्यानंतर त्याने सासू-सासरे आणि विवाह जुळवणाऱ्या मध्यस्थावर फसवणुकीचा आरोप केला. लग्नाच्यावेळी मला आणि माझ्या कुटुंबला अंधारात ठेवले, असा आरोप करत त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

लग्नानंतर पत्नी शरीरसंबंध प्रस्थापित करु शकत नव्हती. त्याने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पत्नीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या रिपोर्टमधुन संबंधित महिला ही तृतीयपंथीय असल्याचे समारे आले.

"लग्नानंतर शरीरसंबंध प्रस्थापित करताना महिला अस्वस्थ होती. ती प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत होती. काही दिवस मुलाने तिची अवस्था समजून घेतली. पण नंतर त्याला संशय येऊ लागला. अखेर त्याने पत्नीला तपासणीसाठी प्रसुतीरोग तज्ज्ञाकडे नेले. चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी तुमची पत्नी तृतीयपंथीय असल्याचे त्याला सांगितले" पोलिसांनी ही माहिती दिली.

पतीने वैद्यकीय रिपोर्ट्सह पोलिसात तक्रार नोंदवली. पत्नी, तिचे आई-वडिल आणि मध्यस्थाविरोधात कलम ४२० अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT