Lakhimpur Uttar Pradesh Team eSakal
देश

"केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं"

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या घटनेत केंद्रीयमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आलेत.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये आज शेतकरी आंदोलना दरम्यान एक मोठी घटना घडली. उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे लखीमपूर खेरीमध्ये येणार होते. यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी हे देखील त्या ठिकाणी येणार होते. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांसमोर निषेध करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाचा आणि शेतकऱ्यांचा मोठा संघर्ष झाला. या संघर्षात जवळपास चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला.

केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला, तसेच या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक शेतकरी जखमी झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर वातावरण चिखळलं असून, त्याठिकाणी जाळपोळ झाल्याचेही समोर आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध होताना दिसतो आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. माजी कृषीमंत्री शरद पवार, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियंका गांधी, प्रियंका गांधी तसेच अनेक इतर अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT