shraddha murder case esakal
देश

Murder Case : उत्तर प्रदेशात आणखी एक 'श्रद्धा'; एक्स गर्लफ्रेंडचे केले सहा तुकडे

सकाळ डिजिटल टीम

Uttar Pradesh : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने देश हादरुन गेलेला असतांना आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक्स गर्लफ्रेंडचा खून करुन तिचे सहा तुकडे करण्यात आलेले आहेत. मृत तरुणीने दुसऱ्यासोगबत लग्न केल्याने आरोपीने तिचा काटा काढल्याची माहिती मिळतेय.

आझमगडमध्ये ही घटना घडली आहे. एका तरुणीचा मृतहेद विहीरीमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. आरोपी प्रिन्स यादव याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मित्राच्या मदतीने त्याने तिच्या शरीराचे सहा तुकडे केले. ते तुकडे त्याने एका पिशवीमध्ये पॅक करुन विहिरीमध्ये फेकले. त्यानंतर तिचं शीर त्याने एका तलावात फेकलं.

हेही वाचाः Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रिन्स यादवला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तावडीतूनदेखील त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याला गोळी लागली. मृत तरुणीने दुसऱ्याशी लग्न केल्याने प्रिन्सने तिचा गळा दाबून खून केला. तिकडे दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतांना उत्तर प्रदेशातल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT