Scrap vehicle 
देश

युपीचं 'भंगार' धोरणं; देशातील ठरलं पहिलं राज्य

हे धोरणं नक्की काय आहे हे सविस्तर जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात भंगार धोरण लागू करणारं उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे पहिलं राज्य ठरलं आहे. यामुळं विशिष्ट कालावधीनंतर जुनी झालेली वाहनं वापरता येणार नाहीत. अशी अनफीट वाहनं रस्त्यावर दिसल्यास ती जप्त करण्यात येऊन थेट भंगार केंद्रात पाठवण्यात येणार आहे. (Uttar Pradesh Scrap policies became the first state in the country)

उत्तर प्रदेश सरकारनं आणलेलं हे भंगार धोरण १५ वर्षे जुनी पेट्रोल आणि १० वर्षे जुनी डिझेल वाहनं फिटनेसशिवाय रस्त्यावर धाऊ शकणार नाहीत. पण जर अशी अनफीट वाहनं तपासणी पथकालाच्या हाती लागली तर ती जप्त करुन भंगार केंद्रात पाठवली जाणार आहेत. लखनऊ परिवहन विभागानं हे धोरणं लागूही केलं आहे. विशेष म्हणजे भंगारात पाठवलेल्या अशा वाहनांची योग्य ती किंमतही वाहन मालकाला मिळणार आहे. यामुळं गुन्ह्यांमध्ये घट होईल, अशी आशा सरकारनं व्यक्त केली आहे.

काय आहे प्रक्रिया?

सरकारनं निश्चित केलेल्या नियमांनुसार जर वाहनांचं वय उलटून गेलं असेल तर लोकांना स्क्रॅपसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी परिवहन विभागानं ऑनलाईन नोंदणीही सुरु केली आहे. युपीच्या परिवहन विभागाच्या वेबसाईटवर आपलं वाहनं स्क्रॅप म्हणून घोषित करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये कुठलीही व्यक्ती, संस्था अर्ज करु शकतात. अर्ज करताना स्टॅम्पपेपरसह कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT